काय अर्थ लावायचा मी... जे आहे ते मान्य का करत नाही ही. मला माहितेय हिला फोन करून विचारल्यावर हि काय म्हणणार पण विचारायला हवं का....?
हो विचारायला हवंच!
(रिंग जाते...बाकी फोन उचलते)
शून्य : हे तू काय टाकलयेस fb वर?
बाकी : कशाबद्दल बोलतोएस तू.
शून्य : तू आणि मी आपण दोघंही हे दाखवत नाही पण आपल्याला पुर्णपणे माहितेय की आपण एकमेकांचे status चेक करतो..मी आत्ताच तुझं status पाहिलंय. काय लिहिलंयेस हे?
बाकी : अच्छा.. तू त्या बद्दल बोलतोएस... अरे मी सहज लिहीलं...
शून्य : कोणत्याच गोष्टी सहज होत नसतात.
बाकी : मला कुठे लिहीता वगैरे येतं अरे तुझ्यासारखं.....
बाकी : मला कुठे लिहीता वगैरे येतं अरे तुझ्यासारखं.....
शून्य : माझ्यासारखं प्रेम करणं तरी कुठे जमतंय तुला. त्यामुळे तुझं आणि माझं कुठल्याच बाबतीत comparison नाही
तू ग्रेटच आहेस… हे का एवढंच फक्त विचारतोय
तू ग्रेटच आहेस… हे का एवढंच फक्त विचारतोय
बाकी : माझ्या व्यक्त होण्यावरही तुला प्रॉब्लेम आहे का...
आणि ग्रेट कोण हे जाणून घेण्यात नाही मला काही इंटरेस्ट...
तुलना न केलेलीच बरी!
आणि ग्रेट कोण हे जाणून घेण्यात नाही मला काही इंटरेस्ट...
तुलना न केलेलीच बरी!
शून्य : तुझ्या व्यक्त होण्यात मी आहे
बाकी : तुझ्यासारखं प्रेम करणं जमलं नाही.... तुझ्यासारखं नाही होता आलं मला.... आणि मला ते जमणार नाही ...
तू वेगळा आहेस आणि मी वेगळी....
तू वेगळा आहेस आणि मी वेगळी....
शून्य : मी तसं कधी म्हणालो ही नव्हतो कि माझ्यासारखं हो म्हणून
तू 'तू' होतीस म्हणूनच आवडलेलीस
बाकी : माझ्या व्यक्त होण्यात तू आहेस असं तुला वाटतंय...
तू 'तू' होतीस म्हणूनच आवडलेलीस
बाकी : माझ्या व्यक्त होण्यात तू आहेस असं तुला वाटतंय...
शून्य : काय? असं मला वाटतंय?
एकदा विचार स्वतः च्या मनाला
निदान तिथे तरी सच्ची रहा
सगळीकडून पळवाट काढता येत नाही
एकदा विचार स्वतः च्या मनाला
निदान तिथे तरी सच्ची रहा
सगळीकडून पळवाट काढता येत नाही
बाकी : मला कोणतेच प्रश्न नको आहेत...
पळवाट काढता येत नाही म्हणूनच पूर्णविराम लावलाय मी...
पळवाट काढता येत नाही म्हणूनच पूर्णविराम लावलाय मी...
शून्य : प्रत्येक वेळी असं म्हणता येत नाही बाकी...
तुला प्रत्येकवेळी विचारताना मी आतून तुटलेला असतो
किंचाळत असतो "हे असं का?"
आणि त्यावर तुझं उत्तर मात्र हे असं उत्तर..
या पूर्णविरामाचाच त्रास होतोय मला!
तुला कळत कसं नाही? संपवण्याआधी एकदा विचार कर कि आपण हे सगळं का सुरु केलेलं!

बाकी : मला नाही बोलायचं यावर काहीचं... प्लीज..
मला समजवता नाही येणार... आणि कदाचित तू समजूही नाही शकणार...
फक्त मी करत असलेली प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी आहे, असं प्लीज समजू नकोस...
माझ्या प्रत्येक कृतीला स्वतःशी जोडू पाहतोयस तू...
तूला हे थांबवाव लागेल...

शून्य : हे जे आधीच ठरवून तू मोकळी होतेस ना त्याचा मला भयंकर त्रास होतो.
मग हे खरं नाहीय का...मी नाहीय का तुझ्या कृतीत?.. सांग नं
मग हे खरं नाहीय का...मी नाहीय का तुझ्या कृतीत?.. सांग नं
बाकी : मी खरंच सांगते आहे... आणि खरंच सांगितलं होतं..आता खरं मानायचं की नाही, हा तुझा प्रश्नय..
शून्य : हो आयुष्यभर काय ते सगळे प्रश्न माझेच आहेत आणि मलाच पडलेत.. रादर माझे प्रश्न जरी वेगवेगळे असले नं तरी तुझी उत्तरं ठरलेली असतात
बाकी : आज पडलेले प्रश्न उद्या वॅलिड असतील असंही नाही ना...? उद्या तुला नवीन प्रश्न पडतील... मुळात मला प्रश्नच नकोएत.. नाही कोणती उत्तर हवीएत...
शून्य : माझ्या कृतीवर माझा कंट्रोल नाही, त्यामुळे इथे थांबावं लागेल, इथून सुरु करू हे नाही जमत मला
बाकी : कुठेतरी हे थांबायला हवं.. हे तरी कळलं आहे तुला तर....
शून्य : कळणं... आणि समोर आलं आहे ते मान्य करणं यात फरक आहे
बाकी : मान्य तू करत नाहीएस...!
शून्य : मग काय करतोय मी?
ते ही आता मला तू सांगणार का?
ते ही सांगून टाक... निदान इथे तरी तुझे हक्क दिसू दे
ते ही आता मला तू सांगणार का?
ते ही सांगून टाक... निदान इथे तरी तुझे हक्क दिसू दे
बाकी : का ताणतोएस…?
ताणलं की तुटणार... हे तूच म्हणायचास..
मग का हा अट्टाहास..
ताणलं की तुटणार... हे तूच म्हणायचास..
मग का हा अट्टाहास..
शून्य : पण सावरलं तर जोडता येतं हे ही मी म्हणायचो
तू तुझ्या सोयीप्रमाणे लक्षात ठेवलंएस
तू तुझ्या सोयीप्रमाणे लक्षात ठेवलंएस
बाकी : मी विसरलेए सगळं...
नाही आठवायचंय मला काहीच...
नाही आठवायचंय मला काहीच...
शून्य : विसरण्यासाठी सगळं लक्षात असावं लागतं
म्हणजे अजूनही काही आठवणी छळतात तुला तर
म्हणजे अजूनही काही आठवणी छळतात तुला तर
बाकी : मला तुझ्यासारखं नाही सगळं उघड उघड सांगता येत...
शून्य : आता पाहिल्यासारखं काहीच राहिलं नाही,विसरून जा
हे कसं उघडपणे बोललीस मग
हे कसं उघडपणे बोललीस मग
बाकी : काही गोष्टी न बोलता तुला कळल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती..
शून्य : ज्या गोष्टी मी बोलून तुला समजत नाहीय तिथे
काही गोष्टी तू न बोलता मी समजाव्या हे चुकीचं नाही का
काही गोष्टी तू न बोलता मी समजाव्या हे चुकीचं नाही का
बाकी : माहीत नाही... जे काही चुकलंय ते माझंच चुकलंय.... चुका माझ्याकडूनच होत गेल्या... मीच चुकीची आहे ... तर तू का मला पुन्हा मिळवण्याचा चुकीचा प्रयत्न करतोय...
शून्य : चूक झाली म्हणून 'सोडून देणं' हा पर्याय नाही
आणि चूक तुझ्या एकटीची नाही
तुझ्या इतकाच मी ही गुन्हेगार आहे
त्याशिवाय का आपलं प्रेम असं वाऱ्यावर....
आणि चूक तुझ्या एकटीची नाही
तुझ्या इतकाच मी ही गुन्हेगार आहे
त्याशिवाय का आपलं प्रेम असं वाऱ्यावर....
बाकी : मी सगळं वाऱ्यावर सोडून दिलंय...
आता वाऱ्यानेच ठरवायचं... काय करायचं आणि काय नाही ते...
आता वाऱ्यानेच ठरवायचं... काय करायचं आणि काय नाही ते...
शून्य : वाऱ्याला दिशा कळली असती तर आणखी काय हवं होतं
बाकी : तूझी फिलॉसॉफी ऐकण्यात नाही इंटरेस्ट मला...
शून्य : मग कशात आहे, फेसबुक वर अपडेट करण्यात?
बाकी : तुझ्यासारखे शब्द नाहीत माझ्याकडे.... माझ्याकडे आता काहीच नाही...मी स्वतःही नाही..
शून्य : माझ्यात आहेस तू अजून
हवं तर घेऊन जा स्वतःला
हवं तर घेऊन जा स्वतःला
बाकी : तुझ्यापर्यंत नाही पोहोचता येणार आता
आणि मला तुझ्यापर्यंतचा प्रवासच नकोसा झालाय...
प्लीज यावर 'का' असं विचारु नको..
आणि मला तुझ्यापर्यंतचा प्रवासच नकोसा झालाय...
प्लीज यावर 'का' असं विचारु नको..
शून्य : मी काय म्हणू? काही विचारण्याआधीच तू सगळं ठरवून टाकलयेस!
आणि तो प्रवास बहुतेक आता तुला जमणार ही नाही..
बाकी facebook वर जे update केलयेस त्यात चुकून माझं नाव आलंय ते तेवढं delete कर..
तेवढाच तुझा प्रवास सोप्पा होईल..
आणि तो प्रवास बहुतेक आता तुला जमणार ही नाही..
बाकी facebook वर जे update केलयेस त्यात चुकून माझं नाव आलंय ते तेवढं delete कर..
तेवढाच तुझा प्रवास सोप्पा होईल..
बाकी : मी स्टेटसच डिलीट करते... रादर फेसबुकचं अकाउंटच डिलीट करायलं हवंय..
शून्य : त्यापेक्षा मला unfriend कर ते जास्त बरं पडेल.
आणि delete करून वस्तुस्थिती टाळता येते.. पण पळता येत नाही
हवं ते कर.. शेवटी बाकी शून्य उरणार ते माहितेय आपल्याला..
आणि delete करून वस्तुस्थिती टाळता येते.. पण पळता येत नाही
हवं ते कर.. शेवटी बाकी शून्य उरणार ते माहितेय आपल्याला..
(बाकीचा बाय ऐकण्याची तसदीही न घेता शून्यने फोन कट केला..)

रंजक आहे, पण काहीतरी टोचल्यासारखं. म्हणजे मऊ गादीवर बसताना कोणाकडूनतरी तिथे पडलेली सुई/टाचणी अचानक टोचावी तसं.
ReplyDeleteरंजक आहे, पण काहीतरी टोचल्यासारखं. म्हणजे मऊ गादीवर बसताना कोणाकडूनतरी तिथे पडलेली सुई/टाचणी अचानक टोचावी तसं.
ReplyDelete