'महिन्याभरापेक्षा जास्त काळ लोटला. शून्य एकदाही बोलायला आला नाही. ना SMS.. ना FACEBOOKवर Status.. ना Whats Appवर Msg. कसा असेल…? जिथं कुठं असेल तिथं त्यानं त्याची काळजी घ्यावी.
..बहुदा सावरला असेल. त्याचं भलं व्हावं. माझ्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला का त्याला? त्याच्या घरच्यांना? सगळ्यांनाच?'
- मनातल्या विचारांना आवर घालत बाकी घराबाहेर पडली.
'एवढ्यात काही लग्न नको. पण घरातल्यांना रोखणार कसं आणि कधीपर्यंत? मुलगी असल्यामुळे स्वतःचं घरही परक्यासारखंच वाटतं कधीकधी.
मी कधी एकदाचे संसाऱाच्या बेडीत अडकतेय याची काळजी घरच्यांनाच जास्तंय.
- विचारांनी थकून गेलेली बाकी ऑफिसात पोहोचली. PC सुरु केला. तेव्हा अचानक त्या मुलाचा निरोप बाकीला आठवला.
ऑफिसच्या कामामुळे आपण पर्सनल mail log in करतच नाही. त्या मुलाला आपण पर्सनल मेल आयडी दिला होता.
कामाचा ताण नव्हता. बाकीने Gamil Log in केलं.
आणि यात खूप खाली शून्यचा महिन्याभरापूर्वी आलेला Mail….
क्षणाचाही विलंब न लावता तिनं Mail उघडला.
Mailचा subject होता… 'तू'
बाकी पत्रात गढून गेली.. शून्यने महिन्याभरापूर्वीच लिहीलं होतं...
तू,
बाकी, ह्या mail चे बरेचसे draft झालेत. दरवेळी send वर गेलेला हात मी मागे फिरवलाय.
दरवेळी तुझ्या उत्तरासाठी मी थांबलोय. आता ते शक्य नाही.
माणसाने प्रेम करावं पण प्रेमात पडू नये...खरंय.
तुझी किती आठवण येते, हे लाल करण्यासाठी केलेला हा खटाटोप नाही. मला बोलायचंय, मला रडायचंय. मला सोबत हवी. आणि माझं असं व्यक्त होणं माझा आधार आहे.
तुला वेळ हवा होता वेळ दिला, विचार करायाला space हवी होती ती ही दिली. आधी नोकरी वगैरे करून दाखव नंतर बघू हे हि मान्य केलं. पण या आधी-नंतर मध्ये फार अंतर वाढत गेलं बाकी...फार
आणि वर तुला समजणार नाही, please मला समजून घे हे हि समजून घेतलं.
तुला खरंच माझी आठवण येत नाही का किंवा मी आठवत नाही का? बाकी माझ्या आयुष्यात ठरवून काहीच होत नाही. तुझ्या सारखं तर नाहीच नाही. तुला आवडत नाही किंवा चालत नाही म्हणून अजून किती आणि काय-काय मागे टाकलंय मी... आणि आता असं वाऱ्यावर सोडलंयेस मला... जमलं तर येऊन बघ काय झालंय ते!
कितीवेळा मीच बोलायचं... तुला नाही वाटत का?
कितीवेळा ठरवून मी type करत असणारा msg delete करायचा.
तुझ्या statusचा माझ्या मनाप्रमाणे अर्थ लावायचा ....कितीदा?
पार लग्नापर्यंत गोष्टी ठरवून मोकळे झालेलो आपण. थांबायला हवं होतं तेव्हाच ...
मला खूप बोलावसं वाटतं तूझ्याशी... तूला खूप ओरडावसं वाटतं... खूप रडावसं वाटतं... जोरात ओरडावसं वाटतं... पण यातलं मी काहीच करु शकत नाही... हे आणखीनच त्रासदायी होतं... जीवं गेलेला बरा... पण सालं असं जखमी झालेलं केव्हाही वाईट...
तू खूप सोप्पा मार्ग निवडला आहेस बाकी... पण वेळ आणि काळ सगळी समीकरणं स्पष्ट करेल... आयुष्याचं गणितच सालं असंय की आपण लगेच वजाबाक्या आणि बेरजा करायला लागतो... शेवटी 'बाकी' उरणारच नाहीये... 'शून्य'च.
एक गोष्ट मला कळतेय बाकी... तुला काय किंवा मला काय किंवा सगळ्यांनाच- कोणालाच त्यांच्या मनासारखा साथीदार कधीच मिळत नाही... मला जशी मुलगी हवी तशी तू नाहीयेस... कदाचित तूला जसा जोडीदार हवाय तसा मीही नसेन... पण आपण एकत्र आनंदी राहू शकलो असतो...असो, सगळ्या फाजील शक्यता... आणि हलकट अपेक्षा...
माझ्या बोलण्यात काही चुकून अपशब्द आले असतील तर माफ कर.
मला माहितेय मी शिवी दिलेलं तुला चालत नाही.मी फार अपेक्षा ठेवलेलं देखील चालत नाही.
बाकी...मी श्वास घेतलेला चालतो का गं...कि तो हि…….
तुझ्या उत्तराच्या प्रतिक्षेत नसलेला,
शून्य

This comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteत्या क्षणातल्या भावना .... आज परत दाटून आल्या,
ReplyDeleteतीच्या स्पर्शातल्या सव्वेदना परत आठवुन गेल्या,
ती दुर गेली,
पण तीच्या आठवणींच्या शिखरावर पुनहा एकदा पाऊल पडले,
अन् स्व:तालाच विचारत राहीलो,
हे असं सर्व का घडले,
मनात नुसत्या प्रशनांच्या रेघोट्याच ओढत होतो....
पण उत्तराची एक पुसट रेघही आत्ता काही उरली नाही,
अन् मी केलेलं प्रेम, तीच्या आयुष्याला पुरलं नाही...
मग शांतपणे त्या रेघोट्यांनकडे एकटक बघत बसलो,
अन् पाणावलेल्या डोळ्यांनी मनातल्या मनातच हसलो....
आत्ता ह्या प्रशनांना काय अर्थ आहे,
अचुक उत्तर मिळालं तरीही ते व्यर्थ आहे,
कारण शांतपणाच्या अंधाराच्या ज्योती, माझ्या आयुष्यावर कधीच पसरल्या,
अन् त्या क्षणातल्या भावना .... आज परत दाटून आल्या....
--------सुमेध गायकवाड
Shunya jitka adklela aahe...tevdhich baki sutsutit vichar kartey
ReplyDelete