बाकीच्या व्हॉट्स अपवर एका Unknown नंबर वरुन मेसेज येतो.
नंबर सेव नसल्यानं डिपीही दिसत नाही. कोणंय कळत नाही.
Unknown number - तू कुठेएस?
तू कुठेएस?
की तू नाहीचएस?
की तू असल्याचे पुरावेही खोटेएत?
मनातली गुंतागुंत खोटीए?
की हे अस्ताव्यस्त पसरत जाणारं
आठवणीचं वादळ खोटंए?
काय खोटंए?
किंवा खरंए?
खऱ्या खोट्या मधूनही
तुझ्या माझ्यासाठी काय बरंए?
तू कुठेएस?
की तू नाहीचएस?
माझ्या निस्तेज चेहऱ्यात आहेस?
की हजारो वर्षांची जागरणं साठवून?
सताड उघड्या असणाऱ्या डोळ्यातएस ?
जमिनीशी तह केलेल्या पावसातएस?
की रखरखत्या मनाने शह दिलेल्या उन्हातएस?
तू कुठेएस?
किंवा तू नाहीचएस?
कुणी कधीच न मारलेल्या डेस्परेट मिठीतएस?
की ओ न दिलेल्या हजारो मायेच्या हाकेतएस?
हजारो अनरिड ई मेल्सध्येएस?
की लाखो ड्राफ्ट, अनडिलिव्हर्ड मेसेजेसमध्येएस?
तू कुठेयस?
की तू नाहीचएस?
की तू असल्याचे पुरावेही खोटेएत?
- जाधव गुरुप्रसाद
बाकी : कुणाचा नंबर आहे हा?
Unkown number : मी शून्य.
नंबरही डिलिट केलास बहुदा माझा...
बाकी : k..
शून्य : पण तू तर मला ब्लॉक केलं होतंस... माझा मेसेज
तुझ्यापर्यंत पोहोचला कसा?
बाकी : मला माहितीये तू रोखल स्वताला...
पण हल्ली खूप आठवण येते रे तुझी...
तुलाही येत असेलच... पण आज सांगवसं वाटलं
शून्य : आठवण आणि माझी?
पण हल्ली खूप आठवण येते रे तुझी...
तुलाही येत असेलच... पण आज सांगवसं वाटलं
शून्य : आठवण आणि माझी?
बाकी : हो.. तुझी.... तुला नाही येत?
शून्य : इतक्या महिन्यानंतर तुला मला हे प्रश्न विचारावेसे वाटतायेत..
मी जगतोय तुझ्या आठवणी शिवाय!
नाही येत तुझी आठवण!!
बाकी : काल तू बर्थडे विश केलंस तेव्हा वाटलं.. सगळं सोडून
निघून यावं तुझ्याकडे.. पण....
त्यात काल तू पाठवलेली ती कविता...
नाही थांबवू शकले स्वताला.. तुला मेसेज करण्यापासून
शून्य : गुरूच्या कवितेमुळे एवढा फरक पडणार होता तर आधी संगायचस
अक्ख्या गुरुला समोर उभं केलं असतं
बाकी : इथेच तर चूक केलीस...
शून्य : बाकी मला आता माझ्या चुका तुझ्याकडून ऐकायच्या नाहीयेत
बाकी : स्वताची गोष्ट दुसर्यात शोधण थांबव शून्य.. for god sake
शून्य : आणि बाकी तू स्वतःला असं इतरांमध्ये हरवायचं थांबव
शून्य : माझा शोध संपलाय
बाकी : प्लीज भांडू नकोस..
बाकी : घरी कसे आहेत सगळे?
शून्य : नाही बाकी मी भांडणारी नाही. तो हक्क माझा नाही
शून्य : बरे आहेत
शून्य : तू कशी आहेस
बाकी : मी कशी आहे हे तुला चांगल माहीत आहे ना शून्य?
बाकी : वाईट आहे मी!
शून्य : माहित असून सुद्धा काय करू शकलो मी फक्त बघण्यावाचून?
शून्य : I hope तुझे प्रश्न सुटले असतील
शून्य : माझ्यामुळे disturb होणारी तू आता शांत झाली असशील
बाकी : हो.. शांत झालेय अस वाटत होत काही महिने..
शांत तर झाले मी, प्रश्न निकाली काढले,
पण सोडवू शकले नाही याची खंत अस्वस्थ करते हल्ली
शून्य : Hmm हल्ली
शून्य : बाकी फार protected वातावरणात वाढलीयेस तू
आणि आपल्या माणसात असलं की दुसऱ्यांची दुःख समजत नाही
बाकी : सॉरी, मला माफ़ कर... पण तू मूव on झालाएस हे पाहुन बर वाटत...
शून्य : मलाही बरं वाटलं. मी असा move on होताना आज असं तू
पाठीमागे खेचलंस हे बघून
बाकी : तुला आठवतै का... एकदा अशाच आपण ट्रैक ला गेलेलो...
माझी पहिलीच ट्रैक होती..
सगळे भरभर पुढे निघून गेले... आणि माझा पाय सटकला
निसर्ड्या मातिवरून...
तेव्हा तू पाठीमागे खेचलस मला... सावरलस.. असो..
चल bye, बोलू नंतर.
शून्य : तू आपल्यातलं सगळं तोडल्यावरही मी मागे खेचत होतो तुला...
पण बहुतेक तुझा हात निसटला, कधीही न सावरण्यासाठी...असो
