Thursday, February 16, 2017

बाकी शून्य - 08





बाकीची मैत्रीण - तुला झालीए..
अख्या बीयर रिचवलेल्या बाकीचं भान हरपलं होतंबाकी हरखून गेली होती..


बाकीला अंधुक अंधुक दिसणा-या गोष्टी आता स्पष्टपणे डोळ्यासमोर मनातल्या मनात लख्ख झाल्या होत्या..तिला शून्य बोलताना दिसत होता...
शून्य - बाकी मला चढत नाही.. असो
बाकी - हम्म्मम एनीवे, मग कसं वाटलं आज दारु पिऊन
शून्यहाहा.. रोज वाटतं तसंच ..छान
बाकी - अच्छाम्हणजे माझ्यापेक्षा दारु नेहमी तुला नशेत ठेवते तर
शून्यतुझी नशा उतरायला ही दारुच कामी येते दारुमुळे नशा चढते, ह्या कल्पना आहेत दारुमुळे आपण स्वतःसारखे वागतो, काही मुखवटा धरता.. आपल्या मनासारखं.

बाकी - वेल मला जर चूज करावं लागलं तुझ्यात आणि दारु मध्ये.. तर मी दारु चूज करेन
शून्य - आणि मी चकणा
बाकी - जोडी जमेगी बॉस!!
शून्य - निदान तिथे तरी जमो,.लोकांच्या गाठी स्वर्गात जमतात.. आपली टेबलावर जमेल

बाकी - लागलास पुन्हा फ्लर्ट करायला
शून्य - हे बघ बाकी हेल्दी फ्लर्टींग इज गुड फॉर हेल्थ
बाकी - शाळा कोणती रे तुझी. की यासाठी स्पेशल कोर्स वगैरे केलाएस
शून्य - पोरांनी कॉम्प्लीमेन्ट द्यावी पण फ्लर्ट करु नयेहे म्हणजे किस करा पण फक्त फ्लाईंग हा…. अशातला प्रकार
चिटकून बसा पण स्पर्श करु नकाअसले प्रकार आहेत हे

शून्यच्या या युक्तीवादावर बाकी यावर निखळ हसली.. शून्य एकटक तिच्याकडे बघतोय हे तिच्या लक्षात आल्यावर
शून्यच्या नजरेला नजर देत तिनं म्हटलं..

बाकी - प्लीज आता मी किती छान हसते असा बोलू नकोस टीपीकली
शून्य - तू छान हसत नाहीस, पण हसताना तू छान दिसतेस

बाकी - हे बघ मी मुंबई पुणे मुंबई १८ वेळा पाहिलायकिंमान डायलॉग्स तरी स्वताचे मारा रे.. तुम्ही आज कालची मुलं म्हणजे नाहोम वर्कचं नीट नाही तुम्हा आजकालच्या पोरांचं
शून्य - आमचं सालं बेसिकच कच्च.
बाकी - एडव्हान्स कोर्स करणाऱ्यांचा प्रोब्लेमच असतो.. आय नो..
शून्य - सिनेमा आणि आयुष्य यात फरक असतो.. हा डायलॉग पण त्यातच होता बरं..
बाकी - असो
शून्य - Are you virgin?
बाकी - तुझ्या जिभेला काही हाड.. काय विचारतोएस तू हे..
शून्य - हा पण डायलॉग होता मुंबई पुणे मुंबई मध्येपुढचं ऐकतच नाही तुम्ही आजकालच्या पोरी..

बाकी - हुश्शकानफडवणार होते मी तुला आता.. मुलींना हॅन्डलच करता येत नाही आजकालच्या मुलांना
.. पटवायचं हे एकच उद्दीष्ट असतं का तुम्हा मुलांचं

शून्य - हॅन्डल.. कृपया अपनी कुर्सी की पेटी बांध दे.. क्योंकी आगे मिलनेवाली लडकी आपकी जिंन्दही ले सकती है.. 
या शायद आपके जिंन्दगी की ले सकती है

बाकी - हां ठिकाय.. मी थोडी जास्त रिएक्ट झाले.. पण तुम्ही मुलींच्या मनातला जाणूनच घेत नाही…. कदरच नसते  मुलांना

शून्य - तु तुझं सांगकाय जाणून घेतलं नाही मी..
बाकी - कायविचारतोय मीसांग ना.. बोलं ना ...बाकी…. 

बाकी आपल्या ट्रान्समधून बाहेर येतेअचानक भानावर आल्यावर एखाद्याचं जे होतं.. नेमकं तेच बाकीचं होतं..
मैत्रिणीसोबत बारमध्ये आलोय हे बाकी विसरुनच गेली होती..

बाकीची मैत्रीण - काय विचारतेय मी.. सांग ना.. बोल नाबाकी..
काय मागवू तुझ्यासाठी आता.. विस्की की बियर…..


बाकी - नको.. आता नाही प्यावीशी वाटत अगंउतरली सगळीराहू दे.. तू पी..

No comments:

Post a Comment